Monday, September 13, 2010

!!! गणपति बाप्पा मोरया !!!

नमस्कार मराठी मित्रहो,

आपल्या पैकी कुणी मला गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थी ह्याची व्याख्या सांगू शकेल?


गणेश चतुर्थी ही पूर्वापार चालत आलेली घरगुती परंपरा आहे, व गणेशोत्सव हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या एकत्रिकरणासाठी सुरु केलेला उत्सव होय ...!!!!


आणि आज,

आज त्या स्व. टिळक ह्यांना किती दुःख होत असेल, जेव्हा........ जेव्हा ते आपल्या सध्याच्या उत्सवा कडे बघत असतील. त्यांचा काय उद्देष्ट होता आणि आज काय चालु आहे आणि आपण सुज्ञ समाज आज काय करीत आहे??

ते कानठळया फोडणारे ढोल,ताशे,नगारे,फटाके आणि अद्ययावत डीजे ऐकून कान बधिर होतात
अरे नाही कोण म्हणत आहे........ नगारे वाजवा ढोलही बडवा उत्सावाला उधाण हे आलेच पाहिजे पण त्यालाही काही मर्यादा आहेत, त्याही जपा !!! जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास नाही होणार व अति आवाजा मूळे होणारे प्रदूषण सुद्धा टाळता येऊ शकेल. 
कोणाचा कोणाला मेळ नाही की, संबंध नाही नुसता सावळा गोंधळ माजला आहे.
त्यात सार्वजनिक उत्सवात पण राजकारणाचा खेळ चालु असतो.
सर्वसाधारण जनता २-३ दिवस क्रमा क्रमाने मोठया मोठया रांगेत तिष्ठत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतात आणि हे थोर राजकारणी नेते तसेच अभिनेते मंडळी त्यांच्या वेगळ्याच दिमाखात येउन वावरून निघून जातात ... का?....... त्यांना काही सोने जड़ले आहे का? हा फरक कश्यासाठी? ते पण माणूसच आहेत ना? मग........?
नवसाच्या नावाखाली केव्ह्ढे आणि किती प्रकार घडतात हे सर्वांना वेगळे सांगायला नकोच. आजकाल देवाला पण लाचलुपत देण्याचे प्रकार हल्ली भलतेच बळावलेत.

पण ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष्य देण्यास वेळ आहे कोणाकडे?....... आणि का म्हणुन लक्ष्य देतील सगळेच एका माळेचे मणी

सर्वात जास्त दुःख तेव्हा होते, जेव्हा आपण आजकालच्या तरुण मंडळीना श्री गणरायाच्या मिरवणूकी समोर दारूच्या नशेत तल्लीन होउन नाचताना बघतो तेव्हा आणि हयात भर म्हणुन आपल्याच बाया बापड्या भेदक आणि हीडीस प्रकारचे हावभाव करत नाचताना बघतो तेव्हा खूप वाईट वाटते आणि का नाही वाटणार? आणि त्यातच कळस म्हणजे जागरणाच्या नावाखाली देवाच्या पुढ्यातच चालु असलेला पत्त्यांचा खेळ, त्यात तीन पत्ती आणि रमी ह्यासारखे जुगार तर सर्रास पणे खेळले जातात....... गणपति हे बुद्धीचे दैवत आहेत असे समजले जाते, पण हा प्रकार बघून ह्या सर्वाना असली बुद्धि कोण देते ते त्या बाप्पालाच माहीत !!!
पण हे कोणा कोणाला वाईट वाटत असेल हयात शंका आहे, पण त्या महान आत्म्याला किती वेदना होत असतील?
अरे खुद्द त्या गणपति बाप्पाला काय वाटत असेल हे सगळे बघून?
पण ह्याने आपल्याला काय फरक पडतो नाही का ?......... आपण लगे रहो मुन्ना भाई म्हणत आपले जैसे थे अविर्भावात वावरणार.......

ह्या गोष्टी काणा डोळा करण्यासारख्या नाहित मित्रांनो........... आजची आपली पिढी ही जाणती व समजूतदार आहे वेगवेगळ्या विषयावर चांगले ज्ञान बाळगून आहे आपणच ह्या सर्व बाबी समजून घेउन पुढची पाउले जपून टाकली पाहिजेत, एखाद्या सामाजिक आणि सार्वजनिक सणाची किंवा उत्सवाची अशी अवहेलना बरी नव्हे, फकत ह्याच नाही तर प्रत्येक धर्माच्या सणाची आपण व्यवस्थित सांगता केली पाहिजे.


लोकमान्य टिळक ह्यांनी एका चांगल्या समाजकारणा साठी गणेशोत्सवाची सुरुवात केली व आपणही ते पावित्र्य राखले पाहिजे व एकजूटिने सामजिक कार्यांत भाग घेतला पाहिजे.

बघा वाचा आणि विचार करा ..........!!!

तुमचाच मराठी मित्र