आपल्या पैकी कुणी मला गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थी ह्याची व्याख्या सांगू शकेल?
गणेश चतुर्थी ही पूर्वापार चालत आलेली घरगुती परंपरा आहे, व गणेशोत्सव हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या एकत्रिकरणासाठी सुरु केलेला उत्सव होय ...!!!!
आणि आज,
आज त्या स्व. टिळक ह्यांना किती दुःख होत असेल, जेव्हा........ जेव्हा ते आपल्या सध्याच्या उत्सवा कडे बघत असतील. त्यांचा काय उद्देष्ट होता आणि आज काय चालु आहे आणि आपण सुज्ञ समाज आज काय करीत आहे??
ते कानठळया फोडणारे ढोल,ताशे,नगारे,फटाके आणि अद्ययावत डीजे ऐकून कान बधिर होतात
अरे नाही कोण म्हणत आहे........ नगारे वाजवा ढोलही बडवा उत्सावाला उधाण हे आलेच पाहिजे पण त्यालाही काही मर्यादा आहेत, त्याही जपा !!! जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास नाही होणार व अति आवाजा मूळे होणारे प्रदूषण सुद्धा टाळता येऊ शकेल.
कोणाचा कोणाला मेळ नाही की, संबंध नाही नुसता सावळा गोंधळ माजला आहे.
त्यात सार्वजनिक उत्सवात पण राजकारणाचा खेळ चालु असतो.
सर्वसाधारण जनता २-३ दिवस क्रमा क्रमाने मोठया मोठया रांगेत तिष्ठत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतात आणि हे थोर राजकारणी नेते तसेच अभिनेते मंडळी त्यांच्या वेगळ्याच दिमाखात येउन वावरून निघून जातात ... का?....... त्यांना काही सोने जड़ले आहे का? हा फरक कश्यासाठी? ते पण माणूसच आहेत ना? मग........?
नवसाच्या नावाखाली केव्ह्ढे आणि किती प्रकार घडतात हे सर्वांना वेगळे सांगायला नकोच. आजकाल देवाला पण लाचलुपत देण्याचे प्रकार हल्ली भलतेच बळावलेत.
पण ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष्य देण्यास वेळ आहे कोणाकडे?....... आणि का म्हणुन लक्ष्य देतील सगळेच एका माळेचे मणी
सर्वात जास्त दुःख तेव्हा होते, जेव्हा आपण आजकालच्या तरुण मंडळीना श्री गणरायाच्या मिरवणूकी समोर दारूच्या नशेत तल्लीन होउन नाचताना बघतो तेव्हा आणि हयात भर म्हणुन आपल्याच बाया बापड्या भेदक आणि हीडीस प्रकारचे हावभाव करत नाचताना बघतो तेव्हा खूप वाईट वाटते आणि का नाही वाटणार? आणि त्यातच कळस म्हणजे जागरणाच्या नावाखाली देवाच्या पुढ्यातच चालु असलेला पत्त्यांचा खेळ, त्यात तीन पत्ती आणि रमी ह्यासारखे जुगार तर सर्रास पणे खेळले जातात....... गणपति हे बुद्धीचे दैवत आहेत असे समजले जाते, पण हा प्रकार बघून ह्या सर्वाना असली बुद्धि कोण देते ते त्या बाप्पालाच माहीत !!!
पण हे कोणा कोणाला वाईट वाटत असेल हयात शंका आहे, पण त्या महान आत्म्याला किती वेदना होत असतील?
अरे खुद्द त्या गणपति बाप्पाला काय वाटत असेल हे सगळे बघून?
पण ह्याने आपल्याला काय फरक पडतो नाही का ?......... आपण लगे रहो मुन्ना भाई म्हणत आपले जैसे थे अविर्भावात वावरणार.......
ह्या गोष्टी काणा डोळा करण्यासारख्या नाहित मित्रांनो........... आजची आपली पिढी ही जाणती व समजूतदार आहे वेगवेगळ्या विषयावर चांगले ज्ञान बाळगून आहे आपणच ह्या सर्व बाबी समजून घेउन पुढची पाउले जपून टाकली पाहिजेत, एखाद्या सामाजिक आणि सार्वजनिक सणाची किंवा उत्सवाची अशी अवहेलना बरी नव्हे, फकत ह्याच नाही तर प्रत्येक धर्माच्या सणाची आपण व्यवस्थित सांगता केली पाहिजे.
लोकमान्य टिळक ह्यांनी एका चांगल्या समाजकारणा साठी गणेशोत्सवाची सुरुवात केली व आपणही ते पावित्र्य राखले पाहिजे व एकजूटिने सामजिक कार्यांत भाग घेतला पाहिजे.
बघा वाचा आणि विचार करा ..........!!!
तुमचाच मराठी मित्र
दिनेश, अगदी खरं आहे!!!!!!!!!!!
ReplyDeleteउत्सवाच्या नावाखाली फक्त तमाशे चालू असतात. कमीत कमी १०१ रुपये तरी वर्गणी दिली पाहिजे असे अलिखित नियम तयार करतात हे लोक....
टिळक असे थोडेच सांगून गेले होते? टिळकांनी स्वतंत्र पूर्व काळात असे उत्सव साजरे करण्या मागे कारण होत कि त्या निमित्ताने लोक एकत्र येतील. आणि स्वतंत्र मिळवण्यासाठी विचार विनिमय करू शकतील..
कारण त्या काळी उघड उघड सभा घेतल्या तर जालियानवाला बाग सारखे प्रकार होत असे......
आज काल असे उत्सव साजरे करतात तेव्हा किती गैर प्रकार होतो? ८ दिवस आधी हे मंडळाचे कार्यकर्ते विद्युत रोषणाई साठी जागोजाग खड्डे करतात. पण तेच खड्डे सण संपला कि हे बुजवतात का? आणि मग गाड्या जाऊन जाऊन हे खड्डे मोठे होतात...आणि मग आपण सरकार ला दूषण लावतो कि सरकार खड्डे बुजवत नाहीत.. अनेक जागी रस्त्या रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण होते.. तेव्ह्या हि सर्व मंडळे म्हणतात कि सण एकदाच येतो ना? अरे पण आपल्या हिंदू समाजात अनेक सण आहेत..सर्व वर्षच ह्या ना त्या सणांनी भरलेले असतें
कदाचित असे ब्लोग वाचून तरी २% समाज सत्यतेच्या जवळ गेला तरी खूप बर्र होईल!
गणराया, तूच बघ आत्ता सारे!!!!!!!
मित्रा आज तुला असा वाटते तरी अजुन कितीतरी लोक हे जाणून आहेत, पण ह्याच्या अनुसरूनच लोक वागतात, कारन त्यांना वाटता, लोक आपल्याला हसतील, चुकीचे प्रकार बंद करायला कित्येक उत्सव मंडल उत्सुक आहेत, पण मिरावानुकी ला dj नाही लावला , वयफल खर्च नाही केला , तर जास्तीत जस्ता लोक येणार नाहीत ह्या भीती पोटी बरेच जन हे करतात,
ReplyDeleteदारु, जुगार हे करून आपण गणेशाचे विटंबन करीत आहोत, आपण अप्रत्यक्ष रित्या त्याचा खुप मोठा अपमान करतोये,
जर गणेशोत्सव मंदालान्ना खर्च करायचाच असेल तर खेड़े गावान मधे मेडिकल केम्प,वृक्षारोपण , विभागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शालेचा वार्षिक kharcha उचलु शकता येवू शकतो,
जर आपल्या समाजातील धनाढ्य लक्ष्मिपुत्रन्नी कोटींच्या घरातील सोन्याचे दागिन्यांचा नवस बोलण्या
ऐवजी गरीब गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचालान्याचा नवस बोलला आणि पूर्ण झालावार अश्या विध्यार्थान्ना मदत केलि तर तो गणपति तुमच्यावर सदैव वरद हस्त ठेवेल,
कित्येक ठिकाणी गणपति मंडलातिल कार्यकर्ते, कामचोर आणि लोभ धरनारे असतात, अश्यवेली नागरिकांनी अश्या लोकन पासून सावध राहिलेले बरे,
यशदा आणि संकेत तुम्हाला शतशः धन्यवाद माझ्या भावना व्यवस्थित जाणून घेतल्या बद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल
ReplyDeleteHii Dinesh,
ReplyDeletewhat a great blog !!! so many nice things u mentioned in a very simple language... mind blowing yaar. keep it up all d best dear :)
खूपच सुंदर लेख आहे दिनेश, खरेच खूप आवडला. मी सुद्धा तू सांगितल्या प्रमाणे वागण्याचे ठरवले आहे, सर्वानी जर असा विचार केला तर खरेच एक नविन क्रांति उदयास येइल ...... तुला खूप शुभेच्छा!!!
ReplyDeletewaah dinesh bhai, ekdam mast aahe
ReplyDeleteasech lihit rahaa all d best!!
ReplyDeleteदिनेश वाचून खूप छान वाटले...........सर्व साधारण माणसे रांगेत थांबून दर्शन घेतात पण या थोर मंडळीना सुद्धा हाच हक्क आहे पण ते तसे करत नाही. ते सुद्धा पहिले सर्व सामान्य माणूस होते याची सुद्धा जाण त्यांनी ठेवायला हवी हे त्यांनी विसरता कामा नये. आणि पत्त्यांचा खेळ असे खेळतात जसे ते लहानपणी खूप पत्त्यांचे बंगले बांधले आहे. असे हि आईकू आले आहेत कि त्यांना जर मंडपात नाही खेळता आले कि ते बंगले बुक करून तिथे खेळतात.
ReplyDeleteYenari pidhi hi swatala watel tech karte! so kiti aatapita kela jivacha tari tyanchyat badal ha khupach kami hoto.
ReplyDeleteKiman ashya lekanmadhun awareness wadhto. mast lekh aahe. something like igniter*!
Prashant P Patil.
thx, dinesh that's great....khre pahata..sadhyache jag he marketing che aahe,.. he khare...pan..jevha ganpati chya navavar marketing keli jate..tevha kai hote te aapn anubhavto aahoch...khare pahata, muslim aani krhichan yanni matr aaplya sananmadhe ajun tari marketing aanleli sahsa pahaila milat nahi...pan aamhi...sadhya kai kai viktoi...ganpati, saibaba shirdi..krusnachi gopalkala...sarich marketing stunt...prameshwarachya navavar..keleli hi sari pape...aahet..nahi ka...pan aamchy ya valya kolyana kevha jag yenar aahe? te ty trimurtinach thauk....
ReplyDeletedhanyvad..
suhas shirke
kharach mitrac he janun genya sarkh ahe pan aj kal koni hya goshti samjat nahi
ReplyDeletesamajat divasn divas haya goshti vadat challya ahe
ganesh utsav mhanje ek manoranjak va paise kamaiche hi ek sadn jhale ahe
lok ek smanya mansla tya line made 530 tas tangun thevtat pan ekada selibreti tech darshan 30 mintat karun jato samnya mansla haklaun lavta ani celbatye 30 mintue bhar bharun darshan gheto ase ka
he kute tari thamble pahije
dhnyvad mitra